_पीएम आवास योजना; अधिक मोठ्या घरांना मिळणार अनुदान
पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र
ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी वाढ केली आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला.
ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी वाढ केली आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला.
बऱ्याच वेळा मध्यमवर्गीय पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे 2021 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.