home आमच्या विषयी माहिती एका दृष्टिक्षेपात योजना नोटीस फलक माहितीचा अधिकार पंचायत लॉगिन                                                                                                                       search


   आमचा एकच ध्यास, गावाचा विकास
 दहिवडी गावामध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना




     राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना 2018-19 अंतर्गत आपल्या गावामध्ये कायमस्वरूपी नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून या अंतर्गत पाण्याची टाकी व पाईप लाइन यासाठी  आपल्या गावाला 29.30 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर खोदकाम यासाठी 15 लाख रुपयांचा निधी , आणि दलित वस्ती साठी 6 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या साठी मा. आमदार मधुकरराव चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शन आणि श्री.रवींद्र (दादा) अंबुरे यांचे कार्य कर्तृत्व व त्यावेळेस कार्यरत असणारे ग्रामसेवक श्री. मार्तंडे साहेब यांची साथ व नियोजन  मोलाचे ठरले.
     गावामध्ये यापूर्वी पाणीपुरवठा योजना राबवली होती परंतु गावामध्ये  सर्व वार्ड मध्ये समान पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत होते. परंतु नव्याने मंजूर झालेल्या सदर योजने अंतर्गत  गावातील  सर्व वार्डमधील नागरिकांना समान शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होईले दृष्टीने सदरील योजना राबवली जाणार आहे.