कोवीड लसीकरणाबाबत थोडक्यात
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रा आ केंद्र सावरगाव ता.तुळजापूर येथे covid-19 लसीकरण दि 12/3/2021 रोजी सुरु होणार आहे. लसीकरण दर बुधवार व शुक्रवार होणार आहे.
लस कोणाला दिली जाणार आहे?--
1) वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणारे सर्व नागरिक
2) 45 ते 60 वयोगटातील दुर्धर आजार असणारे सर्व नागरिक
3) आरोग्य कर्मचारी / फ्रन्टलाइन वर्कर्स
फक्त Cowin ॲप वर नोंदणी करणाऱ्यांनाच लस दिली जाईल, म्हणून सर्वांनी नोंदणी करावी. नोंदणी करण्यात अडचण येत असल्यास जवळील आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचारी यांची मदत घ्यावी. लसीकरणाच्या दिवशी ON SPOT पण तुमची नोंदणी केली जाईल. सोबत येताना ID proof(आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन इ) व 45ते60 दुर्धर आजार असणार्यांनी आजाराचे प्रमाणपत्र आणावे.
महत्वाचे -
लसी विषयीच्या सर्व अफवां पासून दूर राहा. लस नक्कीच सुरक्षित आहे. लसीचे पूर्ण डोस घेतल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी प्रतिकार शक्ती तयार होते. म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये पहिल्या डोस नंतर थोडा त्रास झाला तरी घाबरून जाऊ नका. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. साधी थोडीशी ताप, अंग दुखणे, लसीची जागा दुखणे वगैरे सर्वांना होऊ शकते. याचा अर्थ लस शरीरात तिचा परिणाम करत आहे. याला कोणीही घाबरून जाऊ नये.
जास्तीत जास्त सर्वांनी नोंदणी करा व लस घेऊन कोरोना शी दोन हात करायला तयार राहा. आपल्या घरातील आपले आई-वडील आजी आजोबा यांची काळजी घ्या. कारण आपल्यापेक्षा त्यांना कोरोना ची भीती जास्त आहे. म्हणून त्यांना लस देणे गरजेचे आहे.
COWIN APP वर नोंदणी करण्याची क्रिया
1) www.cowin.gov.in या साईटवर जा
2) Register Yourself वर क्लिक करा
3) मोबाईल नंबर टाका
4) OTP टाका
5) आधार नंबर किंवा इतर ओळखपत्र ची माहिती टाका
6) तुमचे नाव , जन्मदिनांक टाका
7) इतर वैयक्तिक माहिती भरा
टीप: 45 ते 60 वयोगट असणाऱ्या व्यक्तींसाठी दुर्धर आजार चे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.