
मौजे दहिवडी ता.तुळजापूर येथे ग्रा. पं. वतीने गावचे ग्रामसेवक श्री.मार्तंडे एस.बी. यांचा निरोप समारंभ व नवनियुक्त ग्रामसेवक श्री.तांबोळी जे.आय. यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. यामध्ये रोजगार सेवक श्री.राजीव आदलिंगे यांनी ग्रामसेवक मार्तंडे एस.बी. यांच्या कार्यकाळातील मागील चार वर्षातील केलेल्या विविध कामे यावर प्रकाश टाकला. यामध्ये दलित वस्ती सुधार योजना, नळ योजना दुरुस्ती, शौचालय अनुदान, रस्ते बांधकाम, आमदार फंड-घरकुल सदरील कामे व्यवस्थित रित्या पार पाडली यामध्ये यांनी गावाचा सर्वांगीण विकास करून तुळजापूर तालुक्यात दहिवडी गाव आदर्शवन केले. ग्रामसेवक मार्तंडे यांनी मनोगतात आदर्श उपक्रमाबाबत गावचे सरपंच, सदस्य, गावकरी यांची स्तुती केली . तसेच सदरील कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. पुढिल कामकाज यामध्ये सार्वजनिक गाव विहीर, पाणीपुरवठा टाकी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पूर्ण करण्याबाबत श्री.तांबोळी जे.आय. यांना विनंती केली. सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.रविंद्र(दादा) अंबुरे यांनी केले.
सदरील कार्यक्रमाला विस्तार अधिकारी पं. स.तुळजापूर श्री.साळुंके साहेब, श्री.भागवत मंडलिक, श्री.अरुण गाटे, श्री.मधुकर गाटे, श्री.प्रफुल गाटे, श्री.समाधान चिवरे, श्री.विकास अंबुरे, श्री.सतीश गायकवाड, श्री.श्रीहरी अंबुरे, रोजगार सेवक श्री.राजीव आदलिंगे, श्री.सचिन अंधारे, श्री.युवराज शेंडगे,श्री.अर्जुन गाटे, श्री.कुंडलिक गाटे, ग्रा. पं. ऑप.श्री.किशोर जाधव , ग्रा. पं. कर्मचारी श्री.शहाजी डोलारे व श्री.सचिन शेंडगे, श्री.पिंटू गाटे व समस्त ग्रामस्थ दहिवडी उपस्थित होते .